E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीमध्ये आता ’एआय’ कॅमेर्यांची नजर
Wrutuja pandharpure
28 May 2025
पुणे
: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) कॅमेर्यांची चाचणी यशस्वी ठरली आहे. आता सर्व बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर पीएमपीचा प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यास व गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीतील शिष्टमंडळासमोर याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
मंत्रालयाकडून परवानगी प्राप्त होताच सर्व बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. निवडक बसमध्ये ‘एआय’ आधारित कॅमेेरे बसवून नुकतीच चाचणी घेण्यात आली. ही चाचणी विनाअडथळा यशस्वी ठरली. पीएमपीचा दर्जा सुधारून अपघात आणि वेगावर नियंत्रणही ठेवण्यात येणार आहे. तसेच, चालक, वाहक आणि प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रत्येक बसमध्ये दोन कॅमेरे
पीएमपीच्या प्रत्येक बसमध्ये दोन ‘एआय’ कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिला कॅमेरा चालकाच्या स्टिअरिंगजवळ, तर दुसरा कॅमेरा बसमधील शेवट्या भागात लावण्यात येणार आहे. त्यामुळे चालकाच्या हालचालीपासून बसमध्ये प्रवासी प्रवेश करण्यापासून उतरेपर्यंतचे सर्व चित्रीकरण याद्वारे होईल. तसेच बसमध्ये जीपीएस असल्याने बस कोठे, किती वेगाने संचलन करत आहे, यावर नियंत्रण कक्षातून बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
असा होणार फायदा
विनातिकीट प्रवास करणार्यांवर लक्ष राहणार
प्रवाशांची संख्या तातडीने मोजून संबंधित संदेश नियंत्रण कक्षाला समजणार
चालकाच्या चेहर्यावरील हावभाव टिपले जाणार असून, वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यास मदत
चालकाची मानसिक, शारीरिक स्थिती सुस्पष्ट होणार
वादविवादाच्या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून उपयोग
संचलनातील त्रुटी आणि अडथळे दूर करता येणे शक्यकोट
पीएमपी प्रवासाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी बसमध्ये ‘एआय’ कॅमेेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची चाचणी यशस्वी झाली आहे. संबंधित अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच याबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Related
Articles
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
पाकिस्तानात ३४ बंडखोरांना अटक
02 Jun 2025
शासकीय आयटीआयमध्ये ए आय, रोबोटिक्स सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम
05 Jun 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी